Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया...

 

Jammu Kashmir Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये आज(22 एप्रिल 2025) दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर 12 पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या घटनेनंतर लष्कराने परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले.

'दहशतवाद्यांना सोडणार नाही...'

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही,' अशी प्रतिक्रियी पीएम मोदींनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments