तिरोडा (प्रवीण शेंडे): गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाले. हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे पूर्व विदर्भात 48 तासात चक्री वादळ आणि पावसाचे अनुमान होते. त्यांचे हे निकष सत्य ठरत तिरोडा तालुक्यात सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान चक्री वादळासह पाऊसाची सुरवात झाली. तिरोड्यावरून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बिर्शी या गावातील महिला मंगला जितेंद्र बोरकर वय 50 वर्षे यांच्या अंगावर वीज कोसडून मृत्यू झाला, तिला तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याची माहिती तिरोडा पोलीस स्टेशन तिरोडा यांना देण्यात आली असता पुढील कारवाई पोलीस स्टेशन तिरोडा करीत आहे. या चक्र वादळ आणि अवकाळी पाऊसामुळे जीवित हानी झालेली आहे. तिरोडा तालुका प्रशासन त्यांच्या कुटुंबियांना कोणती मदत करतो या कळे विरसी वाशियांचे लक्ष लागले आहे.
👇👇👇Advertisement👇👇👇
Post a Comment
0 Comments