येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची धडाकेबाज कारवाई...
पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो)– येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेलिब्रम आयटी पार्क, कल्याणीनगर, येरवडा येथे असलेल्या 'हॉटेल युनिकॉर्न हाऊस पब'मध्ये दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वाद-विवाद व भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री 1.45 वाजता हॉटेलची तपासणी केली असता, हॉटेल बंद करून साफसफाई सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र या वाद-विवादासंदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही.
विशेष म्हणजे, या हॉटेलवर यापूर्वीही दोन गुन्हे व 10 खटले दाखल असून त्याच्या पार्श्वभूमीवर, 11 एप्रिल रोजी 'हॉटेल युनिकॉर्न हाऊसपब'वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949, कलम 142(2) अंतर्गत कारवाई करत हॉटेल सील करण्यात आले आहे.
येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी ही माहिती दिली.
Post a Comment
0 Comments