पुणे : पुणे-सातारा महामार्गावर आज दुपारी मोठा अपघात टळला. कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी व्हॉल्वो बसने कात्रज शिंदेवाडी पुलाजवळ अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अधिकच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारास घडली. कोल्हापूरवरून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी बस शिंदेवाडी पुलाजवळ आली असताना इंजिन भागातून धुर निघू लागला. काही क्षणांतच बसने आगीचा भडका घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, प्रवाशांनी वेळीच बसमधून खाली उतरल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलिसांनी आणि अपघातग्रस्त कंपनीने यासंदर्भात तपास सुरू केला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा खासगी बस सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Post a Comment
0 Comments