Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

महिलांचे सबळीकरण: महिला एजंट्ससाठी आरोग्य सत्राचे आयोजन करून आयसीआयसीआय लोम्बार्ड ने जागतिक महिला दिन साजरा केला


महिलांचे सबळीकरण: महिला एजंट्ससाठी आरोग्य सत्राचे आयोजन करून आयसीआयसीआय लोम्बार्ड ने जागतिक महिला दिन साजरा केला

पुणे : जागतिक महिला दिना निमित्त, भारतातील अग्रगण्य खाजगी सामान्य विमा

कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने आपल्या १००+ महिला एजंट्सकरिता लाभदायी ठरेल अशा महिला आरोग्य सत्राचे आयोजन केले. या उपक्रमाचा माध्यमाने महिलांना एकूण स्वास्थ्य, शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्याचे महत्वं सांगून त्यासाठी उपलब्ध असलेल्या सहाय्यक प्रणालींची देखील माहिती दिली जाणार आहे ज्यामुळे त्यांचा ज्ञानात भर पडेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा सबळीकरणाचा देखील एक प्रयत्न केला जाईल.

या सत्रामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी आपली मतं मांडली ज्यात महिला आरोग्यातील विविध बाजूंबद्दल त्यांनी महत्वाची माहिती दिली, मग त्यात नियमित आरोग्य तपासण्या असो, उत्तम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब असो किंवा मग तणाव कसा हाताळावा याबद्दलचे नियोजन असो.

हे चर्चासत्र आयसीआयसीआय लोम्बार्डचा कामाचा ठिकाणी महिलांप्रती निरोगी वातावरण निर्मीतीला बळ देण्याचा बांधिलकीचे आणि एकूणच समाज आणि त्यांचाकडे काम करणाऱ्यांना आरोग्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरिता विचारपूर्वक उचललेले एक पाऊल होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

हा उपक्रम आयसीआयसीआय लोम्बार्डचा आपल्या कर्मचाऱ्यांशी त्यांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याप्रती अधिक काळजी घेण्याचा एक विस्तारीत प्रयत्न असून, यामुळे खास करून महिला एजंट्सना स्वतःची काळजी घेणे आणि त्याकरिता असलेल्या सहाय्यक माध्यमांचे महत्वं पटवून देण्याचा एक प्रयत्न आहे.

महिलांचा आरोग्याला प्राधान्य देत आयसीआयसीआय लोम्बार्ड कामाचा ठिकाणी एक सकारात्मकाता निर्माण करण्याचा प्रयत्न तर करतेच आहे पण त्याच जोडीला महिलांना स्वतःचा आरोग्य आणि स्वास्थ्याकडे लक्ष देण्याकरिता प्रोत्साहित देखील करते आहे.

Post a Comment

0 Comments