Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळ ; फसवणूक करणार्‍या बोगस मदरशांच्या मौलानांवर कारवाईची कौनैन फाउंडेशनची मागणी...


मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळ ; फसवणूक करणार्‍या बोगस मदरशांच्या मौलानांवर कारवाईची कौनैन फाउंडेशनची मागणी...

पुणे, 17 मार्च 2025 - कौनैन फाउंडेशनने पत्रकार भवन, नवीपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुणे शहरात गोरगरीबांची मदत फसवणूक करणाऱ्या मदरशांच्या मौलानांवर कडक कारवाईची मागणी केली.

कौनैन फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, पुण्यात प्रत्येक मस्जिदमध्ये आणि बाहेर "फ्रॉड सफिर" यांचा सुळसुळाट झाला आहे. हे व्यक्ती मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांची चेष्टा करत आहेत.

  • काही व्यक्ती मदरसाचा खोटा सफिर बनून, स्वत:च्या वयक्तिक बँक खात्यावर चंदा-जकात जमा करत आहेत.
  • काहींनी मदरशांचे अस्तित्व नसतानाही मदरसाच्या नावाने चंदा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
  • मस्जिदच्या बाहेर भिक्षा मागणारे अनेक लोक बुरखा, दाढी, टोपी घालून लोकांपासून दान मागत आहेत, जे बाहेरून आलेले परप्रांतीय आहेत.

कौनैन फाउंडेशनने चिंता व्यक्त केली की, हे सर्व "टेरर फंडिंग" च्या प्रकारासारखे असण्याची शक्यता आहे.

तसेच महाराष्ट्रात १० हजार कोटींचे रमजान महिन्यात जकात, सदका जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत गौसमुद्दीन करीम शेख, ईम्रान शेख, जुबेर पिरजादे आणि शाह आलम यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

या बाबींचा खुलासा करून संबंधित प्रशासन व सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यासाठी फाउंडेशनने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

98500 47868

Post a Comment

0 Comments