Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

ओएसिस फर्टिलिटीने 'इन द गुड हँड्स ऑफ सायन्स' मोहिमेचे अनावरण आर्ट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये केले...


आधुनिक प्रगत तंत्रज्ञान वापरुन प्रजनन आरोग्याशी संबंधित विविध आजार हाताळून वंध्यत्वाचे प्रमाण कमी करता यावे किंवा त्याला हाताळता यावे म्हणून विज्ञानानाची मदत कशी घेता येईल यावर या कॉन्क्लेव्हमध्ये अधिक भर देण्यात आला आहे.

पुणे : ओएसिस फर्टिलिटी ही भारतातील अग्रगण्य प्रजनन सेवा प्रदाता (फर्टिलिटी केअर प्रोव्हायडर) असून पुणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी सोसायटी (पीओजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने 'इन द गुड हँड्स ऑफ सायन्स' ही अनोखी मोहीम राबवून आर्टिफिशियल रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक्स (आर्ट) कॉन्क्लेव्ह 2025 चा शुभारंभ आज शेरेटन ग्रँड, बंड गार्डन रोड, पुणे येथे करण्यात आला.
या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन डॉ. किरण कुर्तकोटी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटीचे (एएमओजीएस) अध्यक्ष सोबत डॉ. आरती निमकर, पीओजीएस च्या अध्यक्षा आणि सन्माननीय अतिथी, डॉ. मीनाक्षी देशपांडे, पीओजीएस च्या माननीय सरचिटणीस, डॉ. मनीष माचवे, पीओजीएस चे निर्वाचित अध्यक्ष, डॉ. दुर्गा जी राव, ओएसिस फर्टिलिटीच्या सहसंस्थापिका व वैद्यकीय संचालिका, डॉ. नीलेश उन्मेष बलकावडे, प्रादेशिक वैद्यकीय प्रमुख व प्रजनन तज्ञ, श्री. पुष्कराज शेणाई, ओएसिस फर्टिलिटीचे सीईओ आणि डॉ. कृष्णा चैतन्य एम, वैज्ञानिक प्रमुख आणि चिकित्सालयीन भ्रूणशास्त्रज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक प्रगत तंत्रज्ञान वापरुन प्रजनन आरोग्याशी संबंधित विविध आजार हाताळून वंध्यत्वाचे प्रमाण कमी करता यावे किंवा त्याला हाताळता यावे म्हणून विज्ञानानाची मदत कशी घेता येईल हे स्पष्ट करणे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आर्ट कॉन्क्लेव्ह हे शैक्षणिक व तंत्रज्ञानाने प्रेरित एक खास मंच आहे आणि म्हणून त्याने सुप्रसिद्ध मान्यवरांना एकत्र आणले आहे ज्यात सामील आहेत - प्रजनन तज्ञ, विशेषज्ञ, सर्वश्रेष्ठ भ्रूणशास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित स्त्रीरोगतज्ञ. या कॉन्क्लेव्हमध्ये राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्था व व्यवसायातील 180 हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या, जसे की ओव्हम पिक-अप (ओपीयू), वीर्य धुण्याचे तंत्र, हिस्टेरोस्कोपी. कार्यशाळेनंतर तज्ञांची संभाषणे आयोजित केली गेली होती आणि येथे वंध्यत्वाच्या विविध विषयांवर प्रतिष्ठित राष्ट्रीय प्राध्यापकांनी स्वतःची अंतर्दृष्टी सांगितली. अमूल्य ज्ञान आणि महत्त्वाच्या गोष्टी या सत्रांमधून सहभागी व्यक्तींना आणि प्रतिनिधींना प्राप्त झाल्या.
उद्घाटनानंतर डॉ. दुर्गा जी राव, ओएसिस फर्टिलिटीच्या सहसंस्थापिका आणि वैद्यकीय संचालिका म्हणाल्या, "विज्ञान आव्हानांचे रूपांतर शक्यतांमध्ये कसे करता येईल हे आर्ट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये दर्शविले गेले आहे. आम्हाला व्यावहारिक कौशल्ये वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यशाळा आणि त्याचसोबत कायदेशीर चौकटी व प्रगत निदानोपयोगी धोरणांना संबोधित करण्यासाठी 'आर्ट लॉ' आणि 'अस्पष्ट वंध्यत्व' या विषयावरील सत्रे आयोजित करण्याची उत्सुकता लागली आहे. व्यावसायिकांना अधिक चांगले रुग्ण परिणाम सुनिश्चित करता यावे म्हणून व प्रजनन औषधांमधील नैतिक पद्धती टिकवून ठेवण्यासाठी साधनांनी सुसज्ज करणे हे या सत्रांचे उद्दीष्ट आहे." 
वैज्ञानिक प्रमुख आणि चिकित्सालयीन भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. कृष्णा चैतन्य एम. म्हणाले, "नवउपक्रमाच्या माध्यमातून वंध्यत्वावर मात करण्याची आमची बांधिलकी 'इन द गुड हँड्स ऑफ सायन्स' या थीममुळे स्पष्ट दिसून येते. आर्ट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये, आम्ही 'मूलभूत वीर्य विश्लेषणाचे स्पष्टीकरण आणि त्याचे इष्टतम व्यवस्थापन' या विषयावरील सत्रासोबत पुरुष प्रजननच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर भर देणार आहोत आणि आयव्हीएफ प्रोटोकॉल आणि तंत्रांमधील प्रगतीची तपासणी करणार आहोत. लोकांमध्ये जागरूकता वाढविणे आणि माहितीपूर्ण प्रजनन निर्णयांसाठी पुराव्यावर आधारित अंतर्दृष्टी देऊन व्यक्तींना सक्षम करणे, हे व्यासपीठाचे उद्देश आहे."  

डॉ. निलेश उन्मेष बलकावडे, प्रादेशिक वैद्यकीय प्रमुख व प्रजनन तज्ञ म्हणाले, "विज्ञान व ए.आय च्या मदतीने आम्ही प्रजनन संबंधी आव्हानांना अचूकतेने आणि आशेने संबोधित करीत आहोत. एकेकाळी अडथळे पार करता येणार नाहीत असे वाटणारे उपाय आर्ट उपलब्ध करून देत आहे आणि त्यायोगे आरोग्यसेवेतील कल्पकतेच्या परिवर्तनकारी प्रभावाची पुष्टी करत आहे. आमच्या केंद्रात प्रगत तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन, पुराव्यावर आधारित उपचार यांच्यामुळे व्यक्तीप्रमाणे रुग्ण सेवेसाठी मार्ग मोकळा झाला आहे आणि आयव्हीएफ औषधोपचारांच्या माध्यमातून जैविक मूल देण्यासाठी कठोर प्रयत्न केले जात आहेत."


या कार्यक्रमात बोलताना, पुष्कराज शेणाई, ओएसिस फर्टिलिटीचे सीईओ म्हणाले, "आर्ट कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये आमची थीम, 'इन द गुड हँड्स ऑफ सायन्स' ही स्वप्ने साध्य करण्यासाठी अचूकता आणि काळजी यांची सांगड घालण्याचे आमचे ध्येय दर्शवत आहे. हजारो अग्रगण्य स्त्रीरोगतज्ञांचा आणि प्रसूतिशास्त्रज्ञांचा विश्वास असून प्रजनन औषधांमध्ये सहकार्य, नवउपक्रम आणि प्रगतीस प्रोत्साहन देण्याचा आम्ही अभिमान बाळगतो. ओएसिस फर्टिलिटी मध्ये, आम्ही या प्रगत उपचारांना सुलभ आणि प्रभावी बनविण्याची बांधिलकी स्वीकारली आहे. समाजाची अधिक चांगली सेवा करण्याचे आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक जोडप्यांना मदत करण्याचे ध्येय आम्ही ठेवलेले आहे."

कॉन्क्लेव्हमध्ये अभ्यासपूर्ण सत्रेही झाली, ज्यात सामील होते - डॉ. दुर्गा जी राव यांचे 'अस्पष्ट वंध्यत्व', डॉ. कृष्णा चैतन्य एम यांचे 'पुरुष वंध्यत्वाबद्दल काहीही', डॉ. निलेश उन्मेष बलकावडे यांचे 'आयव्हीएफ बद्दल काहीही' आणि डॉ. निलेश उन्मेष बलकावडे यांचे 'आयव्हीएफ चा संदर्भ केव्हा घ्यावा' यावर तज्ञमंडळाची चर्चा. त्यानंतर प्रश्नमंजुषा सत्र झाले, ज्यात उपस्थितांना सादर केलेल्या विषयांच्या बाबतीत संवाद साधताना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली.

ओएसिस फर्टिलिटी प्रजनन सेवेत आघाडीवर असून चिकित्सालयीन उत्कृष्टता आणि प्रगत तंत्रज्ञान उपचार प्रदान करते. उपचारांमध्ये प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर ॲन्यूप्लॉइडीज (पीजीटी-ए) सारख्या प्रक्रियांचा समावेश आहे. या प्रगतीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावून गर्भधारणेची आव्हाने भेडसावणाऱ्या तरुण जोडप्यांना तसेच गुणसूत्र विकृतींचा इतिहास असलेल्या कुटुंबातील जोडप्यांना निरोगी जैविक मुलांना जन्म देण्यासाठी मदत केलेली आहे. "कापा इन व्हिट्रो मॅच्युरिटी (आय.व्ही.एम)" प्रथम ओएसिस फर्टिलिटी ने सादर केले आणि हे एक असे औषध-मुक्त आयव्हीएफ पर्याय आहे जे पीसीओएस ने पीडित रूग्णांसाठी किंवा मागील खराब आयव्हीएफ परिणाम मिळालेल्या रुग्णांसाठी खास फायदेशीर असते."

ओएसिस फर्टिलिटी बद्दल:
ओएसिस फर्टिलिटी हे सद्गुरु हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट आहे आणि तिने भारतातील प्रजनन सेवेत क्रांती घडवून आणली होती. प्रजनन उपचारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सर्वोत्तम पद्धती आणि प्रोटोकॉल लागू करून हे साध्य केले गेले होते. आमच्या "वन-स्टॉप" डे-केअर क्लिनिकने सल्लामसलत, तपासणी आणि उपचार एकाच छताखाली देऊन होणाऱ्या पालकांना सोयीस्कर व सहाय्यक वातावरण प्रदान केले आहे. ओएसिस फर्टिलिटी ची स्थापना 2009 मध्ये केली गेली होती आणि तिने उच्च यश दरावर आधारित एक उत्कृष्ट प्रतिष्ठा निर्माण केली होती जे आंतरराष्ट्रीय संपर्क असलेल्या अनुभवी वंध्यत्व तज्ञांच्या आमच्या कार्यसंघाने प्रेरित होते. आम्ही आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशामधील 30 केंद्रांमध्ये आमची उपस्थिती वाढविली होती. अधिक माहितीसाठी, कृपया https://oasisindia.in/ येथे लॉगिन करा. 
मीडिया प्रश्नांसाठी, कृपया एम.एस.एल शी संपर्क करा:

Post a Comment

0 Comments