नाशिक (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो):- नाशिक शिक्षण विभागात बोगस स्वाक्षऱ्या करून मान्यता, बोगस शालार्थ आयडी, बोगस ड्राफ्ट टाकण्याचा पासवर्ड कुणाकडे याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण विभागातील लुटारू टोळीचे खुले आव्हान कसे पेलणार? असा भला मोठा प्रश्न सद्या निर्माण झाला आहे.
नाशिक शिक्षण विभागातील जिल्हापरिषदेचे तत्कालीन, आजी शिक्षणाधिकारी, आजी माजी उपसंचालक यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात तब्बल 413 शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी सुध्दा देण्यात आला. याबाबतचा रेकॉर्ड प्राप्त होताच या प्रकरणाच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्याची टोळीची पुरव्यासह यादी सादर होणार आहे.
बोगस नियुक्तीसाठी लाखो रुपये शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमलेल्या दलाल, एजट, काही संस्थाचालकांचे कर्मचारी यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची उघड होणार आहे.तसेच अनेक अधिकारी कर्मचारी यांचे नातेवाईक यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या सर्व प्रकरणाची कागदपत्रे सादर होणार आहेत.
आवक जावक रजिस्टर गायब?
विशेष म्हणजे या काळातील आवक-जावक रजिष्टर शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांनी हे रजिष्टर गहाळ केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शासन मंजुरी नसतानाही संस्था चालकांनी या बोगस नियुक्त्यांच्या आधारे मागील काळातील शासनाचे कोट्यवधी रुपयांचे वेतन अनुदान लाटले आहे. यासाठी नाशिक (जळगांव, धुळे, नंदुरबार सह नाशिक ) शिक्षण विभागात रॅकेट सक्रीय असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी व त्यांचे अधिकृत दलाल सहभागी असल्याची चर्चा आहे. प्रकरण दडपण्यासाठी काही संस्थाचालक कामाला लागल्याची चर्चा आहे.
दलालमार्फत बोगस फाईली गाडीच्या डिक्कीत भरून कार्यालयात आणली जातात, दिवसभरात काम न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घरी आवक जावक रजिस्टरसह सह्या होत असतात?
काही प्रकरणात संस्थेचा प्रस्ताव नाही, शिक्षण विभागाची मान्यता आदेश, शालार्थ आदेश नाही डायरेक्ट पगार चालू करण्यात आले शासनाची लाखो रुपयाची लूट करणारी टोळी लवकर नावासह घोषित होईल.
नाशिक शिक्षण विभागातील (जळगांव, धुळे, नंदुरबार, मालेगाव नाशिक ) सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय संघटनाचे पदाधिकारी यांनी शोधून काढलेल्या भ्रष्टाचार मुळे त्रस्त झालेल्या टोळीने विशिष्ट मार्गाने तोंड दाबण्याचा प्रयत्न पडद्याच्या मागून घडवून आणण्याचा प्रकार होत आहे. अनेक माहिती अधिकाराची अर्ज शिक्षण विभागातून गहाळ, तक्रारी अर्ज गहाळ,माहिती अर्जातील गोपनीय माहिती लीक करून संबंधिताना पुरवून दाबव आणण्याचा प्रयत्न करणारी टोळी करत आहे.
धमाका तो होगा, ब्रेक के बाद.....!
कुछ तो बहुत बडी गडबड है?
लवकरच भाग 2
Post a Comment
0 Comments