Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद उदय सामंतांना?


रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला सार्वजनिक बांधकाम खाते येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन कोणती खाती मिळणार याबाबतचे गुढ कायम आहे. भाजपकडे असणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्यासह इतर दोन वेगळी खाती शिवसेनेकडे येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री पद यशस्वीरीत्या भूषवलेल्या रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना हे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळणार असल्याचे शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला तेव्हाच आमदार उदय सामंत हेसुद्धा शपथ घेणार या विश्वासाने रत्नागिरीतील शिवसेनेचे अनेक नेते मुंबईतील आझाद मैदानावरच्या शपथविधीला उपस्थित होते. केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम खात्यासह इतर दोन वेगळी खाती मिळणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही माहिती रत्नागिरी जिल्ह्यात पसरली असून महत्त्वाचे असे सार्वजनिक बांधकाम खाते उदय सामंत यांनाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी शिवसेनेकडचे उद्योगमंत्रिपद भाजप किंवा राष्ट्रवादीकडे जावू शकणार आहे. वेगळी तीन खाती शिवसेनेकडे न आल्यास यावेळीही शिवसेनेकडेच राहणार्‍या उद्योग मंत्रालयावर उदय सामंत यांचाच दावा असणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments