Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

माजी आमदाराच्या पुतण्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा : वेगात गाडी चालवत रस्त्यावर गाड्यांचे नुकसान पण अनर्थ टळला !

Kapil Dhole Patil Road Accident

माजी आमदाराच्या पुतण्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा : वेगात गाडी चालवत रस्त्यावर गाड्यांचे नुकसान पण अनर्थ टळला !

पुणे :- पुण्यातील माजी आमदाराच्या पुतण्याने मद्यधुंद अवस्थेत ताडीवाला रस्त्यावर वेगवान वाहन चालवत गोंधळ घातला. बाप्पु कुटी पंचरत्न हॉटेल ते गणपती चौक ढोले पाटील रोड ( Dhole Patil Road Accident ) या मार्गावर कपिल ढोले पाटील यांनी त्यांच्या
Kapil Dhole Patil Road Accident

इनोवा क्रिस्टा (एम एच १२ एस टी ४५९९) गाडीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 
Kapil Dhole Patil Road Accident
              (नुकसान झालेल्या क्रेटा गाडीची अवस्था)
ह्युंडाई क्रेटा (एम एच १२ वी झेड ०३४०) आणि इतर दुचाकी वाहनांना उडवले. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे ताडीवाला रस्ता पोलिस चौकीचे ( Tadiwala Road Police Chowky Bundgarden Police Station ) पोलीस सहायक पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल ढोले पाटील ( Kapil Dhole Patil Rash Driving Accident ) यांच्या गाडीचा वेग पाहून काही युवकांनी इतर नागरिकांना बाजूला हटवण्यासाठी 'बाजूला व्हा' असे सांगत त्या गाडीच्या मागे धाव घेतली. अखेर गाडी गणपती चौकाजवळ थांबताच ढोले पाटील यांनी "हा रोड आमचा आहे, मला कोण काय करेल बघतो!" असे आव्हान दिले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

बंडगार्डन पोलिसांनी कपिल ढोले पाटील यांना रात्री ससून रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यांचा मद्यप्राशनाचा अहवाल प्राप्त झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. मोटार वाहन अधिनियमांतर्गत कलम ८४ आणि ८५ तसेच भारतीय संहिता अंतर्गत कलम २८१ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड ( Senior PI Ravindra Gaikwad Bundgarden Police Station Pune City Police ) यांनी टाइम्स ऑफ महाराष्ट्रला सांगितले.

( Times Of Maharashtra )

गुन्हा दाखल मात्र कारवाई काहीच नाही...
 गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी कारवाई काहीच केली नाही याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की "जीवित हानी झालेली नाही, काय कारवाई करायची" म्हणजे पोलिसांचे म्हणणे असे होते की जर एखादा माणूस या अपघातात मृत्युमुखी पावला असता अथवा जखमी झाला असता त्यावेळेस पोलिसांनी विचार केला असते. त्यासाठी पोलीस त्यावेळेसची वाट पाहत आहेत.

याबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी असे देखील सांगितले की जर हेच गोरगरीब नागरिकांकडून चूक झाली असती तर त्याला तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता मात्र हे एका राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्यांच्या घरातले असल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई केली गेली नाही. कायदा फक्त गोरगरीब नागरिकांसाठी आहे का? असे नागरिकांमध्ये चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.


एफआयआर देण्या बाबत पोलिसांचा नकार ;
या अपघाताची एफआयआर देण्याबाबत पोलिसांकडे विचारणा केल्यावर त्यांनी देण्यास नकार दिला. आणू आम्ही एफ आय आर कॉपी देऊ शकत नाही. असे पत्रकारांना सांगण्यात आले. पोलिसांच्या अशा जबावामुळे प्रकरणात काहीतरी दडल असल्याचा संशय निर्माण होत आहे.

यातून रस्त्यावरील सुरक्षा आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Post a Comment

0 Comments