Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे महानगरपालिकेत आरटीआय अर्जावरून घोटाळ्याचा आरोप, मुज्जम्मील शेख यांची गंभीर बाब...


अतिक्रमण विभागातील अधिकारी माहिती दडपण्याच्या प्रयत्नात ?

भाग 1

पुणे :- पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप लावण्यात आला आहे. हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी आरटीआय अंतर्गत दाखल केलेल्या अर्जावरून विभागातील अधिकारी माहिती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
शेख यांनी अतिक्रमण काढण्यासाठी कंत्राटी बीगारी पुरवणाऱ्या 'यु आर फॅसिलिटी सर्विसेस' या ठेकेदाराची माहिती मागितली होती. या ठेकेदाराचे मालक यांच्याबाबतची माहिती देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
या प्रकरणात शेख यांनी सांगितले की, "मी माहिती घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर मला माझ्या पहिल्या अर्जाची माहिती देण्यात आली तेही माहिती मला अपुर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली, मी त्यांना अर्जात विचारलेली पूर्ण माहिती देण्याकरिता कळविले पण त्यावर त्यांनी मला सांगितले की ही माहिती ठेकेदाराकडे असते त्यांच्याकडून घेऊन देतो. मात्र पुणे मनपाच्या अटी शर्तींच्या कागदांमध्ये दर महिन्याला सर्व कागदपत्रे पुणे मनपाला जमा करून तेव्हाच बिले अदा करण्यात येईल असे अटी शर्तींमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे. मात्र पुणे मनपाचे पर्यवेक्षक यांनी कदाचित ठेकेदारांबरोबर लागेबांधे असल्यामुळे कोणतेही प्रकारची कागदपत्र घेतले नाही आणि कागदपत्रे न तपासता त्यांचे बिले अदा करण्यात आले असे दिसून आले. 

               👇👇 अटी शर्तींचा पुरावा 👇👇
          
आणि त्यांना हे ही विचारले का मी अपील अर्ज करतो तर अधिकारी मला सांगतात की, अपील अर्ज करू नका आम्ही माहिती देतो, मात्र 20 दिवस उलटून गेले तरी मला माहिती मिळाली नाही. मला असे वाटते की, या ठेकेदाराची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार असल्याने अधिकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून अधिकाऱ्यांना याचा मलिदा मिळेल."
हे नेमके कागदपत्रे का देत नाहीत असा प्रश्न सद्या उपस्थित झाला आहे नेमका काहीतरी यामागचे मोठ्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता शेख यांनी लवकरच महापालिका आयुक्त यांच्याकडे जाऊन या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करणार आहेत. या ठेकेदाराची सर्व कामांची तपासणीसाठी देखील आयुक्तांना सांगणार आहे. तसेच, पाठराखण करणारे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.


भाग 2 मध्ये या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची माहिती आणणार समोर...

क्रमशः

Post a Comment

0 Comments