Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

नोएल नवल टाटा संभाळणार टाटा ट्रस्टची कमान; अध्यक्षपदी एकमताने निवड

 


TATA Trust : नोएल नवल टाटा संभाळणार टाटा ट्रस्टची कमान ; अध्यक्षपदी एकमताने निवड...


ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्र्स्टच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

याचे उत्तर आता मिळाले असून, टाटा ट्रस्टने शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत नोएल टाटा यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

Video : आता 'रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार'; राज्य सरकारची मोठी घोषणा

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. मागील चाळीस वर्षांपासून टाटा समुहात कार्यरत आहेत. टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डात ते सहभागी आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि टाटा स्टील तथा टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

OK TATA : ट्रकच्या मागे लिहिलेल्या 'ओके टाटा' शब्दांचा अन् रतन टाटांचा संबंध काय?

टाटा कुटुंबात नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्न केले होते. नवल टाटा यांचा पहिला विवाह सूनी कमिश्रिएट यांच्याशी झाला होता. त्यांना रतन टाटा आणि जिमी टाटा अशी दोन मुले होती. रतन टाटा आणि जिमी टाटा यांनी लग्न केले नाही. नवल टाटा आणि सूनी कमिश्रिएट वेगळे झाल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्विस उद्योगपती सिमोन यांच्याशी लग्न केले. नोएल टाटा हे नवल टाटा आणि सिमोन यांचे पुत्र आहेत.

रतन टाटांचा खास मित्र कोण? वयानं लहान कामात मात्र वाघ; जाणून घ्या, पुणेकर शांतनुचा किस्सा..

नोएल टाटा यांनी याआधी ट्रेंट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून 11 वर्षे काम केले आहे. त्यानंतर, त्यांची 2012 मध्ये ट्रेंटचे उपाध्यक्ष आणि नंतर 2014 मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठाचे पदवीधर असून, याशिवाय त्यांनी फ्रान्सच्या INSEAD बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे.

Post a Comment

0 Comments