Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दंड थोपटत आव्हान दिलेल्या नेत्यांना भाजपनं डावललं; पर्वतीला मिसाळ तर कोथरूडला पाटलांना उमेदवारी

 




पुणे : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघ आणि पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाले होते. या वादात भाजपने अगोदरच्या आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी दिली आहे.

आजच भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभेतून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभेतून सिद्धार्थ शिरोळे यांना लढण्याची संधी दिली आहे.

पुण्यातील कोथरूड, पर्वती आणि कसबा मतदार संघातून पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसून आले होते. या वादात नव्या उतरलेल्या नव्या माणसाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर भाजपने जुन्याच उमेदवाराला हिरवा कंदील दाखवत निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. बालवाडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. बालवडकर कोथरुडमधून इच्छुक असल्याने त्यांना पक्षातून डावललं जातंय असा आरोप त्यांनी पाटील यांच्यावर केला होता. तर पर्वती मतदार संघातून माधुरी मिसाळ आमदार होत्या. श्रीनाथ भीमाले यांनीही माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला थेट आव्हान देत इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी मग मी कुठून लढू? असा प्रश्न पक्षालाच विचारला होता. यंदा मला वरिष्ठ निवडणूक लढविण्याची संधी देतील. म्हणूनच मी लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी केला होता. शिवाजीनगर मध्ये विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुक असणारे अँड. मधुकर मुसळे काय करणार याकडे लक्ष लागले आहे. आता मात्र दंड थोपटलेल्या नेत्यांना भाजपने डावललं असून माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.

कसब्याचे काय होणार

कसबा विधानसभा सध्या भाजपच्या ताब्यात नाहीये. मागील पोटनिडणुकीत धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव केला होता. मात्र आताच्या लोकसभेत कसब्यातून धंगेकरांना सरावात कमी मतदान झाले. याठिकाणी दोन्ही पक्षांना जोर लावूनच प्रचार करावा लागणार आहे. अशातच विधानसभेत भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीच मतदारसंघावर जोरदार दावा ठोकल्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीला चांगलंच आव्हान निर्माण झालंय. त्याबरोबरच कुणाल टिळकही या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments