Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे मनपा अतिक्रमण विभागाचा तुघलकी कारभार : अतिक्रमणात नसलेले दुकानदारांचे साहित्यही केले लंपास...


पुणे मनपा अतिक्रमण विभागाचा तुघलकी कारभार : अतिक्रमणात नसलेले दुकानदारांचे साहित्यही केले लंपास...

तुघलकी कारभारामुळे व्यावसायिकांमध्ये अधिकाऱ्यांची दहशत...


पुणे (मुज्जम्मील शेख) :- पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग आपल्या अजब-गजब कारभारासाठी आता प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेतीळ अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत मनमानीपणे काम करीत असल्याने व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय 7 दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी पथकाने फर्ग्युसन रोडवर केलेल्या कारवाईत अत्यंत मनमानी कारवाई करीत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क दुकानाच्या आत असलेले साहित्यदेखील जप्त करून नेल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे.
खरेतर अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधी अतिक्रमणाची स्पष्टपणे माहिती घेणे गरजेचे आहे. ही माहिती असल्यास प्रत्यक्ष अतिक्रमणात नसलेला भाग तोडण्याचा किंवा अतिक्रमणात नसलेले साहित्य जप्त करण्याची गरज नसते. मात्र, मनपा अधिकारी व कर्मचारी यांना एक तर माहिती कमी असावी किंवा त्यांनी ठरवून आणि जाणुनबुजून कारवाई केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण मागील केलेल्या कारवाईत अक्षरशः दुकानात घुसून दुकानातील साहित्य अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त केले. यातून स्पष्टपणे दिसून येते की, या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत मोठी चूक झाली आहे. कारण यासंदर्भातील स्पष्ट व्हिडिओ फुटेज व्यावसायिकांकडे उपलब्ध आहेत. 

                  👇👇 पहा व्हिडिओ 👇👇

यासंदर्भात फर्ग्युसन रोडवरील व्यावसायिकांशी संपर्क साधला असता, त्यांनीही स्पष्टपणे सांगितले की, अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आमच्या दुकानात शिरले व त्यांनी दुकानातील साहित्य, तसेच साहित्य ठेवण्याचे स्टँड जप्त केले. व्यावसायिकांनी वारंवार विनंती केली की, आमच्या दुकानातील साहित्य जप्त करू नका. परंतु कर्मचाऱ्यांनी कुणाचेही ऐकले नाही. काही दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तर अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. 
यावरून अतिक्रमणविरोधी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट होत आहे. अशाप्रकारे आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांव कारवाई केली जाणार का, असा प्रश्न व्यावसायिक व त्यांचे कामगार विचारत आहेत.


आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे पुणे महानगरपालिकेवर ताशेरे...
एफसी रोड येथे झालेल्या कारवाई बाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, सदर कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे. अक्षरशः दुकानाच्या आतुन साहित्य जप्त करत असतील तर हे कृत्य पुणे महानगरपालिकेला शोभत नाही असे करणे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले आहे.


बड्या अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार...
एकीकडे छोट्या व्यावसायिकांवर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हतोडा चालतो आहे, तर दुसरीकडे फर्ग्युसन रोडवर मात्र मोठ्या व्यावसायिकांनी बरेच अतिक्रमण केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने वाडेश्वर रेस्टाॅरंट, सुप्रसिद्ध असे गुडलक कॅफे, सुप्रिम सँडविच, रुपाली हॉटेल, आर डेक्कन साईड मार्जिन, माया लॉज साईड मार्जिन, रेमंड शोरूम साईड मार्जिन, रिचमोउंड आईसक्रीम व इतर हे आहेत. तसेच या बड्या व्यावसायिकांनी अवैधरित्या साईड मार्जीनमध्ये अतिक्रमण केलेले आहे. परंतु त्यावर मात्र अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाईची हिम्मत होत नाही की या बड्या व्यावसायिकांशी त्यांचे अर्थपूर्ण साटेलोटे आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. 
याच फर्ग्युसन रोडवर केसरिया मार्केट तर पूर्णपणे तळमजल्यावरील पार्किंगमध्ये आहे. वर्षानुवर्षांपासून याठिकाणी कोणत्याही अतिक्रमणावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न या परिसरातील दुसरे व्यावसायिक उपस्थित करीत आहेत. 
पुण्यातील अनेक इमारतींनी आपल्या साईड मार्जीनमध्ये व्यवसाय सुरू केलेले आहे. हे स्पष्टपणे अतिक्रमण असूनसुद्धा अतिक्रमणविरोधी पथकाला हे दिसून येत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.


याबाबत माहिती घेण्यासाठी अतिक्रमण निरीक्षक शशिकांत टाक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी आपला फोने बंद करून ठेवला असल्याचे निदर्शनास आलेत आहे.


लवकरच पुणे महानगरपालिकेच्या सर्व अतिक्रमण विभागाचा बोगस कारभार टाईम्स ऑफ महाराष्ट्र आणणार जनतेच्या आणि अधिकाऱ्यांच्या समोर...

Post a Comment

0 Comments