Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ; १३८ शास्त्रज्ञांच्या लेखांचा गोषवारा (अ‍ॅबस्ट्रॅक बुक) चे प्रकाशन...

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ; १३८ शास्त्रज्ञांच्या लेखांचा गोषवारा (अ‍ॅबस्ट्रॅक बुक) चे प्रकाशन...


पुणे (३ जुलै) ; उर्जा, कृषी, आर्टीफिशियल इंटेलिजेन्ट, मटेरियल सायन्स सारखे वेगवेगळ्या विषयामध्ये होत असलेले बदल. त्या बदलामुळे मानवावर होणारे परिणाम, यातून मानवाचे जीवन सुखी होत आहेत. या सर्व विषयांवर संशोधन करणारे वेगवेगळ्या शास्त्रंज्ञांनी केलेले कार्य हे एकंदरीतच वरदान ठरू शकतात. असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भरत काळे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची पहिली राष्ट्रीय विज्ञान परिषद विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने १३८ शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाच्या गोषवाराचे(अ‍ॅबस्ट्रॅक बुक)  पुस्तक प्रकाशन एमआयटीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाला सुब्रमण्यम, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. 
डॉ. भरत काळे म्हणाले, आयोजित पुस्तकात देशातील उच्च कोटीच्या शास्त्रज्ञांचे विस्तृत लेख समाविष्ठ आहेत. यामध्ये विज्ञान क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भटनागर पुरस्कार प्राप्त शास्त्रांज्ञांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि अध्यात्मामुळे भारत कसा विकसीत होईल, डिजिटल ट्रान्फॉर्ममेशन, हेल्थ केयर, क्लाइमेट चेंज, सस्टेनेबल डेव्हल्पमेंट आणि अत्याधुनिक मटेरियल व मॅनिफॅक्चरिंग सारख्या विषयांचा समावेश आहे. 
डॉ. बाला सुब्रमण्यम म्हणाले, भविष्यकालिन तंत्रज्ञानावर आधारित परिषद होत आहे. यामध्ये अ‍ॅडव्हॉन्स मटेरियल, एआय सारखे नव नविन संशोधनांचा समावेश आहे 
डॉ. मिलिंद पांडे यांनी पहिली राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे महत्व समाजावून सांगितले. तसेच डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सांगितले की, एमआयटी डब्ल्यूपीयूने स्वतःचे रिसर्च सेंटर सुरू केले आहे. या विद्यापीठता एकूण ५०० विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी नोंदणी केेली आहे. तसेच ३५ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. 

Post a Comment

0 Comments