काशिफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 1000 रेशनकिटचे वाटप आणि समाज उपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न...
कोंढवा, पुणे : काशिफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका भव्य कार्यक्रमात कोंढव्यातील गरजू लोकांना 1000 रेशन किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी आणि वृक्षारोपण मोहीम यांचा समावेश होता.
हा कार्यक्रम काशिफ सय्यद यांच्या सहकारी मित्र आणि कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि गरजू लोकांना मदत करण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
पाऊस सुरू असताना देखील नागरिकांची मोठी गर्दी!
कार्यक्रमा दरम्यान अक्षरशः पाऊस सुरू असताना देखील नागरिक पावसात भिजत या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळाले.
या वाढदिवसाच्या निमित्ताने काशिफ सय्यद यांना मतरुपी आशीर्वाद देणार असल्याचे देखील नागरिकांनी सय्यद यांना आशीर्वाद दिल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाचे आयोजक काशिफ सय्यद यांनी सांगितले की, "मला माझ्या वाढदिवसाचा उत्सव गरजू लोकांना मदत करून आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणून साजरा करायचा होता. मला आनंद आहे की, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि अनेकांना मदत करता आली. पुढील काळात अशीच मदत करत राहील तसेच लवकरच अनेक शासकीय योजनांचे शिबिर घेणार आहेत." असे काशिफ सय्यद यांनी सांगितले.
या कार्यक्रमात काशिफ सय्यद यांचं सामाजिक काम तळागाळात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.
या कार्यक्रमाने कोंढव्यातील लोकांवर सकारात्मक परिणाम केला आहे. आणि समाजात बंधुभाव आणि एकात्मतेची भावना निर्माण करण्यास मदत केली आहे.
Post a Comment
0 Comments