मुस्लीम समाजाच्या भावना दुखवणारा पुणे कोल्ड्रिंक्स याचा मालक लच्छु दनवाणी याला लष्कर कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ; लष्कर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना हाकलून देत असल्याचे चित्र...
पुणे :- पुणे शहरात दोन दिवसांपासून वातावरण अतिशय खराब झाले होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्यातील कॅम्प भागात असलेले डन्स डेअरी आणि पुना कोल्ड्रिंक्स हाऊसचा मालक लच्छु दनवाणी याने 31 मे शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या भावना दुखवणारी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक वर केली होती.
काय केली होती पोस्ट ?
हे 2 पोस्ट केले होते.
यामध्ये मुस्लीम समाजाची मजार बद्दल आणि वक्फ प्रॉपर्टी बद्दल तसेच अतिशय आक्षेपार्ह शब्द आणि दुसऱ्या पोस्ट मध्ये काही डबल मिनींग वाक्यांचा अनुवाद केला असल्याचे दिसत आहे.
यामुळे शहरातील मुस्लीम अनुयायी अतिशय नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु मुस्लिम समाजाने पोलिसांवर पूर्ण विश्वास ठेवून कायदा हातात न घेता याच्या अनुषंगाने मुस्लीम समाजातील वरिष्ठांनी मिळून गुन्हा दाखल केला. याच्यादरम्यान हे सर्व प्रकरण सुरू असताना मुस्लीम समाजातील वरीष्ठ हे लष्कर पोलीस ठाण्यात रात्री 10 तर 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालली. यामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर यांच्याकडुन आरोपीची बाजू घेत असल्याचे काहींनागरिकांमध्ये बोलले जात असल्याचे कुजबुज ऐकायला मिळाली. मुस्लीम समाजातील नागरिकांना लष्कर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर हाकलुन देत असल्याचे देखील पाहायला मिळाले. यावर इलियाज शेख यांनी पोलीस निरीक्षक मगर यांना सांगितले की, मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हे नागरिक नॉन वायलेन्स पब्लिक आहे. कृपया आपण यांना हाकलू नये. संविधानाने त्यांना हक्क दिला आहे. आपण संविधान आणि कायद्या नुसार चला. त्याठिकाणी असलेले बाकी सर्व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, उपनिरीक्षक राहुल व इतर पोलीस मुस्लीम समाजाच्या आणि युवकांच्या भावनेला समजुन घेत होते. आणि त्यांना समजून सांगत होते. तसेच यामध्ये पुणे शहर पोलीस परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी मुस्लीम समाजाला हा गुन्हा दाखल होण्यासाठी खूप मदत केली असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये युवकांना कायदा, सुव्यवस्था आणि संयमता राखण्यासाठी सलीम मौला पटेल, मुज्जम्मील शेख, अजहर शेख, फहिम शेख, काशिफ कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर तातडीने लष्कर पोलिसांनी 31 तारखेला लच्छु दनवाणी याला सुमारे 11 वाजताच्या सुमारास अटक केली. यामध्ये आणखीन एक प्रकार असा घडत होता की, त्यावेळीस तो अटक झाला आणि तो कोठडीत होता तेव्हा देखील त्याचा फोन अथवा दुसऱ्या कोणाच्या फोनमध्ये फेसबुक अकाउंट लॉगिन होते. नागरिकांनी याबाबत पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी असं काही नाही त्याचा फोन जप्त केल्याचे सांगितले. परंतू सुमारे 11:30 ते 1 वाजेपर्यंत लच्छु दनवाणी याने फेसबुक मधील 3 ते 4 वर्षात टाकलेले आक्षेपार्ह काही पोस्ट डिलिट करून टाकले. यामध्ये नेमका असा प्रश्न उद्भवला की लच्छु दनवाणी पोलीस कोठडीत होता तर त्याचे फोन मधुन पोस्ट डीलीट कोण करत होतं. असं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे देखील चौकशी होणे गरजेचे आहे. कल्याणी नगर चा प्रकरण देखील याच्याशी जोडता येऊ शकतो. कारण पुरावा नष्ट करण्याचे काम अक्षरशः पोलीस ठाण्यात बसवून होत असेल तर कसं चालणार.
तसेच काहींनी लच्छु दनवाणी याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचे देखील सांगितले. त्याला कोठडीत बसण्यासाठी अक्षरशः खुर्ची दिल्याचे समजत होते. याचा मुस्लिम समाजातील वरिष्ठांनी पोलिसांना सांगितले की तो आरोपी आहे त्याला आरोपी सारखीच वागणूक द्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोठडीत खाली बसवले.
कल्याणीनगरचा प्रकरण अजून सुद्धा संपलेलं नाही या प्रकरणातमुळे पुणे शहर पोलीसांच नाव यामुळे अतिशय खराब झाले आहे. पुणे शहर पोलीस आता आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी काम करत असताना लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर यांना याची गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले.
पिज्जा बर्गर अशी ट्रीट मेंट देत असल्याचे दिसून येत होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर लष्कर पोलीसांनी दुसऱ्या दिवशी 1 जून शनिवारी लष्कर कोर्टात हजार केले असता. त्याचे तपासणी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर होते परंतु त्यांनी न येता त्यांनी त्यांच्या कडील सहायक पोलिस निरीक्षक दांडगे यांना पाठवले. कोर्टाने दोन्ही बाजु ऐकून घेतली. त्यावर कोर्टाने लच्छु दनवाणी याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या व्यापाऱ्याच्या अश्या पोस्टने कॅम्प भागातील व्यापारी यांनी यावर शोकांतिका व्यक्त करत आहे.
ज्या भागात लच्छु दनवाणी याचा व्यवसाय आहे. तो सर्व भाग मुस्लिम बहुल आहे. आणि यांचे 70 ते 80 टक्के ग्राहक हे मुस्लीम समाजातील आहे. तरी देखील असे द्वेष मुस्लीम समाजाबद्दल ठेवणे हे अतिशय निंदनीय आहे. याच्यामुळे आता सर्व व्यापाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारी वकील ऍड नवगीरे मॅडम, ऍड अतुल सोनवणे, ऍड धनश्री बोऱ्हाडे, ऍड एम एम सय्यद, ऍड प्रविण जगताप, ऍड फरहा सुलताना यांनी युक्तिवाद केला आहे.
आणि गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयन्त फिर्यादी अहमद सय्यद, मूनवर कुरेशी, जावेद खान, इलियाज शेख, अबीद सय्यद, मन्सूर शेख, सुफीयान कुरेशी, असलम सय्यद, मुज्जम्मील शेख, खिसाल जाफरी, आतिक मोमीन, वाजीद शेख, समीर शेख आणि आदींनी प्रयत्न केला आहे.
अधिक माहिती आणि अपडेट साठी व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा👇🏻
https://chat.whatsapp.com/EGFnOBSClc0Dc5H8dK3vC4
Post a Comment
0 Comments