Type Here to Get Search Results !

गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ...

गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ...

पिंपरी चिंचवड : येथील परिसरात दगडाने ठेचून एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १) भर दिवसा काळेवाडी फाटा येथे घडली आहे. खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव रीहान शेख (रा.जुनी सांगवी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रीहान शेख याच्यावर काही जणांनी हल्ला केला होता. काळेवाडी फाटा येथे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरवात केली. रीहान शेख याच्यावर पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळे गुन्हे आहेत. पूर्ववैमानस्यातून त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments