Type Here to Get Search Results !

Add

Add

मविआमध्ये विधानसभेच्या 'एवढ्या' जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा...

मविआमध्ये विधानसभेच्या एवढ्या जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा...

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागा लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

नेमके काय म्हणाले मनोज आखरे?

'नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागा लढवण्याची तयारी केली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील हिंगोली आणि चिखली विधानसभा मतदारसंघासह इतर तेवीस जागा आपण लढवणार आहोत. असं आखरे यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी कार्यकारणीच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments