काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार राडा गाड्यांची तोडफोड...
निवडणुकीदरम्यान देशातील काही मतदारसंघांकडे सगळ्यांचच लक्ष आहे. या मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे. उदहारणार्थ महाराष्ट्रातील बारामती.
ठराविक लोकसभा मतदारसंघातील लढती या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे प्रसंगी टोकाचा संघर्ष पहायला मिळतोय. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर काही उपद्रवींनी गोंधळ घातला, तोडफोड केली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रदर्शन करुन या गुंडगिरीचा विरोध केला. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला आहे.
अमेठीच्या गौरीगंज येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात हे सर्व घडलं. कार्यालयाबाहेर काही गाड्या उभ्या होत्या. त्याचवेळी काही समाजकंटक तिथे आले, त्यांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. राडा घालणारे नशेमध्ये होते. कार्यालयाच्या आत असलेले काँग्रेस कार्यकर्ते तोडफोडीचा आवाज ऐकून बाहेर आले, तो पर्यंत ६-७ गाड्यांमध्ये तोडफोड झालेली होती.
कार्यकर्त्यांच्या मनात संताप
काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पळवून लावलं. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात संताप आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा जोरदार विरोध केला. पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कठोर कारवाईच आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
Post a Comment
0 Comments