पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध...
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज पब आणि ड्रग्जचे शहर म्हणून देशभर झाली आहे. आधी ललित पाटील आणि आता धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवाल याच्या बाळाचा प्रताप, यामुळे शहरातील सर्वसामान्यांचे जीवनदेखील ढवळून निघाले आहे.
आधी शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे शहर आज पबच्या आवाजात हरवले आहे. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, बालेवाडी हायस्ट्रीट या परिसरात बहुसंख्येने पब आहेत. हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे.
शहरातील सर्वच पब हे धनाढ्य लोकांचे अथवा त्यांच्या पाल्यांचे आहेत. शहरातील पबचे पार्टनरसुद्धा नामवंत खेळाडू, अभिनेते असल्याने युवकांमध्ये त्याची क्रेझ आहे. पब चालक-मालकांपैकी जवळपास प्रत्येकाच्याच सोशल मीडिया अकाऊंट, व्हॉट्सॲप डीपीवर राजकारण्यांसोबतचे फोटो आहेत. यासह पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबतदेखील यांचे फोटो असल्याने 'आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच वागणार' असा बोध इतरांना होत होता. कल्याणी नगर येथील बड्या बापाच्या बाळाने दारूच्या नशेत दाेघांना मारले. त्यानंतर शहरातील हे पब कल्चर कसे धोकादायक आहे, हे पुढे आले.
Post a Comment
0 Comments