भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात मुरलीधर मोहोळ यांची रॅली...
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला तरुण मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुण मतदारांचा जल्लोष पाहायला मिळाला. तसेच नागरिकाकडून मुरलीधर मोहोळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राष्ट्रभूषण चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली पंचहौद चौकातून, पुढे सरळ शितळादेवी चौक, सुभेदार तालीम नेहरू चौक, सुभान शहा दर्गा फुलवाला चौक, कस्तुरे चौक, जानाई मळा, लोहियानगर पोलीस चौकीमार्गे, समताभूमीकडे गेली. त्यानंतर चांदतारा चौक ,घोरपडे पेठ पोलिस चौकी, दलाल चौक, मिठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा ननावरे चौक, कर्मशाळा कोठीमार्गे, मार्गस्थ झाली आणि शेवटी एकबोटे कॉलनी, येथे तिचा समारोप झाला.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या भागातील
रॅलीत सहभागी झालो. इथंही तरुण मतदारांचा जल्लोष कमी नव्हताच.
इतर रॅली प्रमाणे भेटायला येणाऱ्या मतदारांचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून काहीतरी सांगायचं होतं.
Post a Comment
0 Comments