जास्त दबाव पडल्याने डॉक्टराणी केला आत्महत्याचा प्रयत्न...
पुणे : रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आपल्यावर इतका दबाव टाकण्यात आला की आपण आत्महत्या करणार होतो, अशी कबुली डॉ. हळनोर यांनी पुणे पोलिसांना दिली आहे.
माझी चूक झाली पण माझ्यावर दबाव होता. मी वरिष्ठांना देखील याची माहिती दिली होती. मी माफीनामा दिला होता. पण, या सर्व घटनांमध्ये माझ्यावर दबाव असल्यामुळे मी या गोष्टी केल्या. यामुळेच मी तणावात गेलो होतो. माझी आत्महत्या करण्याची मानसिकता झाली होती, असा कबुली जबाब श्रीहरी हळनोर याने पोलिसांना दिला आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा'चा व्हॉट्सअॅप ग्रुप
Post a Comment
0 Comments