पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर...
पुणे : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज पुण्यात लोकसभेसाठीा मतदान होतं आहे. काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप केला.
या आरोपाला आता भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दर निवडणुकीला मतदानादिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं.पुरावा काहीच नसतो तरीही लोकांची दिशाभूल करायची. लोकांनी आता त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे. लोक त्यांना उत्तर देतील, असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिले.
रवींद्र धंगेकरांचा आरोप
काल पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरुच होतं.जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
Post a Comment
0 Comments