अनिशचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत...
पुणे : कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जीव गेला. या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच अनिश अवधिया याच्या कुटुंबाकडून पोलिसांच्या कारवाई बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अनिशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अनिशच्या मृत्यूने कुटुंब हादरून गेले आहे. अनिश हा मध्यप्रदेशातील शहडोल येथे रहात होता. ज्यावेळी या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा अनिश ची आई आणि आजी बेशुद्ध पडल्या. अनिशची आठवण काढत कुटुंबीय टाहो फोडीत आहे. अनिश चे नातेवाईक आत्माराम अवधीया यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की , 'अनिश हा महिन्यापूर्वीच घरी आला होता. त्याने त्याच्या स्व कमाईतून स्वतःसाठी एक खोली केली होती. नंतर कंपनीतून फोन आल्याने तो पुण्याला गेला. अनिशची खोली पाहून कुटुंबातून सदस्यांचे अश्रू थांबत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
हा अपघात नसून खून
या अपघाताच्या घटनेनंतर अनिशच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे.
सदर अल्पवयीन मुलगा अति वेगात गाडी चालवत असताना हा मृत्यू होऊनही अगदी साधी कलमे लावली असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच हा अपघात नसून खून असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment
0 Comments