पंतप्रधान मोदींची पुण्यातील स.प महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आता रेस कोर्स येथे होणार...
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रेसकोर्सवर सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
दरम्यान, त्याच दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा होणार आहेत.
पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर मोहोळ, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या माहितीनुसार, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त सभा होणार आहे. या सभेला संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्स मैदानावर सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments