Type Here to Get Search Results !

पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीसांची टीका...

पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीसांची टीका...

कोल्हापूर : मोदी पंतप्रधान हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ही निवडणूक ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे.

देशाचा नेता कोण असेल, हे निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढील पाच वर्ष देश कुणाच्या हाती सुरक्षित राहिल, देशाचा विकास कोण करु शकेल, हे ठरवणारी निवडणूक आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधकांना काहीही पडलेलं नाही

कोल्हापुरात सभा झाली पाहिजे, ही लोकांची मागणी होती. कोल्हापुरात पंतप्रधान मोदी यांची सभा होतेय, याचा आनंद आहे. जनतेचा आशीर्वाद कोल्हापूर आणि महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींना मिळणार आहे. विरोधकांच्या हातून एक मुद्दा गेला याचं त्यांना दुःख आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना काहीही पडलेलं नाही, असं म्हणत कांदा निर्यात प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 

पंतप्रधान मोदी शरद पवारांसाठी धोक्याचे

पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचं आहेत, शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे. 2019 मध्ये देखील अशा सभा मोदींच्या झाल्या होत्या आणि यावेळी मात्र एका दिवशी दोन किंवा तीन होत आहेत. जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, लवकरच त्याची अनाउन्समेंट होईल, अशी माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली आहे. याशिवाय फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. कोण संजय राऊत? असं म्हणत संजय राऊत यांच्या प्रश्नावर फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments