Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

साताऱ्यातील 11 अधिकाऱयांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर...

साताऱ्यातील ११ अधिकाऱयांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर...

सातारा : राज्य पोलीस दलात उल्लेखनीय तसेच विशेष कामगिरी करणाऱया साताऱयातील ११ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना 'पोलीस महासंचालक पदक' (डीजी मेडल) जाहीर झाले आहे. दि. १ मे रोजी हे पदक प्रदान केले जाणार आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, अरुण देवकर, सहायक फौजदार संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत शिंदे, श्रीधर ठोंबरे, नंदकुमार महाडिक, पोलीस हवालदार महादेव घाडगे, विनोद राजे, पोलीस शिपाई विपीन ढवळे, मंगेश जाधव यांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर झाले आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती सध्या पंढरपूर येथे आहे. सातारा तालुका पोलीस ठाणे, पुसेगाव याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक असताना पोलीस ठाण्यांना भौतिक गरजा चांगल्या पुरवून, त्या आयएसओ मानांकित करण्यासाठी व त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर सध्या सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी असून, या अगोदर त्यांनी जिल्हा विशेष शाखा, सांगली तसेच सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सातारा येथे सेवा बजावली आहे.

हवालदार विनोद राजे यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केले आहे. सध्या सातारा पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या 'उंच भरारी' या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पोलीस शिपाई विपीन ढवळे हे सध्या महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. ते ऍथलेटिकपटू असून, अनेक सुवर्णपदके त्यांनी सातारा पोलीस दलाला मिळवून दिली आहेत. पोलीस दलात असतानाही आरोग्य निरोगी ठेवत धावण्यासोबतच शरीरसौष्ठव स्पर्धेतही ते सहभागी होतात.


Post a Comment

0 Comments