निलेश लंके का झाले नाराज? अजितदादांनी सांगितलं नेमकं कारण...
पुणे : राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज निलेश लंके यांच्या 'मी अनुभवलेला कोविड' या पुस्तकाचं प्रकाश शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
याच कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे पक्षप्रवेशाचा अजून विचार केलेला नाही, माझ्या कार्यक्रम पत्रिकेत तसा कोणताही उल्लेख नसल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे. दरम्यान आता निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश लंके हे स्थानिक राजकारणामुळे नाराज आहेत. विरोधकांकडे त्या लोकसभा मतदारसंघात कोणताही उमेदवार नसल्यामुळे ते निलेश लंके यांना गळ घालत आहेत. मात्र मी निलेश लंके यांना सांगितलं आहे, कुठेही काही चुकीचं करू नका अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिली आहे.
जागा वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान अजूनही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. भाजपनं काल आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील वीस उमेदवारांची नावं आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्यानं अजूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीयेत. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीची आणखी एक बैठक होणार आहे, वीस टक्के जागा वाटपाबाबत निर्णय बाकी आहे. त्यानंतर जागा वाटप जाहीर होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Post a Comment
0 Comments