Type Here to Get Search Results !

बस थांबल्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्याला अटक.

बस थांबल्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्याला अटक...

पुणे : बस थांब्यावर असलेल्या गर्दीत बसमध्ये चढणाऱ्या भोसरी  प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मोहन गणेश जाधव (वय ३२ रा. मुंढवा, पुणे. मूळ रा. अंबरनाथ, मुंबई), शिवराज अर्जुन वाडेकर (वय २५, रा. मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस प्रवासात तसेच बसमध्ये चढताना प्रवाशांचे दागिने चोरीला जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानुसार त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. भोसरी पोलीस ठाण्यातील एक पथक पीएमटी चौक, भोसरी येथे गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसले.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यात त्या दोघांनी नाशिक फाटा बस थांबा, पीएमटी बस थांबा भोसरी येथून प्रवाशांचे दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयने, अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, प्रतिभा मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments