Type Here to Get Search Results !

पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून पुण्यातील धक्कादायक घटना.

पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून पुण्यातील धक्कादायक घटना...

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी कुणाचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीचा चाकूने वार करून आणि उशिने तोंड दाबून खून केला.

आज पहाटेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात हा प्रकार घडला. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

श्वेता तळेवाले (वय ४०), शिरोली तळेवाले (वय १६) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीत मागील काही दिवसांपासून सतत भांडण व्हायचे. आर्थिक वादातून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याचे रूपांतर शुक्रवारी रात्री भयंकर प्रकारात घडले. पती-पत्नी शुक्रवारी पुन्हा भांडण झाले. यावेळी पत्नीने तुम्हाला सोडून मी माहेरी निघून जाईल असे सांगितले. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली. त्यानंतर उशिने तोंड दाबून तिचा खून केला. हे सर्व घडत असताना मुलगी देखील त्या ठिकाणी आली. मुलगी भांडण झाल्यानंतर नेहमी आईची बाजू घेत असल्याने त्याचा राग आरोपीच्या मनात होताच. त्याने तिचाही तोंडावर उशी दाबून खून केला. या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments