Type Here to Get Search Results !

नसरापूर येथे जुने वडाचे झाड कोसळले ; मोठी दुर्घटना टळली.

 

नसरापूर येथे जुने वडाचे झाड कोसळले ; मोठी दुर्घटना टळली...

नसरापूर :  तालुक्यातील येथे वेल्हे नसरापूर मार्गावर मुख्य बाजारपेठ रस्त्यालगत जुने झाड कोसळले असून झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल परिसरातील अनेक वर्षांचे जुने वडाची झाड आहेत (दि.28) कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महावितरणच्या वीज वाहिनी खांबांचे तसेच तारांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच महावितरणचे कर्मचारी कैलास मोहिते, रोहिदास रावलं, कैलास भोई, तसेच वन विभागाचे कर्मचारी तांबे सर पगडे सर, नसरापूर ग्रामपंचायत सदस्य सुधीर वाल्हेकर, माजी ग्रा स ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलांनी घटनास्थळी दाखल झाले.

नसरापूर गाव चे स्थानिक नागरिक प्रज्योत कदम यांनी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिल्याने झाड हटविण्यात आले. तर कांबरे खेबा गावचे  तरुण दीपक शिंदे व संतोष शिंदे यांच्या सतर्कतेमुळे तीन मुलींना वाचवण्यात यश आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कांबरे गावचे पोलीस पाटील सुमित कांबळे यांनी सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  नसरापूर परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वर्षांची जुनी झाड असून परिसरातील नवीन गृहनिर्माण सोसायटय़ांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने सोसायटी मधील नागरिक रात्री च्या वेळी रोड लागत जुन्या झाडांच्या परिसरात कचरा टाकत आहेत. परिणामी रस्त्यावर टाकलेला टाकत स्थानिक नागरिक त्याला त्या कचऱ्याचा त्रास होतो म्हणून पेटवल्याने झाडांचे नुकसान होत असल्याने अश्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपचायत नसरापूर ने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक कित्येक वर्ष झाले करीत आहेत

Post a Comment

0 Comments