Type Here to Get Search Results !

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता आवश्यक...

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता आवश्यक ; प्रा.डॉ.दत्तात्रय खुणे

नसरापूर ;- व्यवसाय करताना आपली सकारात्मक मानसिकता असल्यास यश हमखास मिळते, व्यवसायासाठी अंगी जिद्द, चिकाटी असणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला व्यवसाय सुरु केल्यानंतर १००० दिवस त्या व्यवसायातून किती नफा व तोटा होतो याकडे लक्ष न देता तो व्यवसाय टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत प्रा.खुणे यांनी व्यक्त केले. शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर येथील वाणिज्य व बी.बी.ए.(सी.ए.) विभागांतर्गत शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित “व्यवस्थापन सप्ताह” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे, डॉ.राजेंद्र सरोदे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.सोनवणे सर यांनी व्यवसाय करायचा असेल तर जो व्यक्ती आनंदी, उत्साही आहे अशीच व्यक्ती व्यवसायात यशस्वी होते. व्यवसाय कोणता निवडावा हे ठरविताना आपला छंद, आवड या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आवड असेल तर माणूस कमीत कमी दिवसात यशस्वी होतो.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. ज्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, एम.सी.ई.डी., मिटकॉन यांसारख्या संस्था उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षणाचे कार्य करतात. तसेच बँकांच्या, सहकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते असे आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली कोंडे, सुत्रसंचालन प्रा.प्रल्हाद ननावरे तर आभार प्रा.वर्षा तनपुरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments