Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात BRCDGV सदस्यांची चौथी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात BRCDGV सदस्यांची चौथी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात BRCDGV कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, "जागतिक व्हिलेजच्या बदलत्या गतिशीलतेतील व्यवसाय जोखीम" या विषयावर नुकतीच आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतराष्ट्रीय केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र -कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले.

जागतिकीकरणाच्या बदलत्या धोरणामध्ये भारताच्या आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षमतांमुळे भारत हा जागतिक बदलांच्या अग्रस्थानी असेल असे मत इंडो-युरोपियन एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुमार यांनी या परिषदेत मांडले. यावेळी An Emerging Trends in foreign Direct Investment out of the current European Economic Catastrophe नावाचे त्यांनी लिहलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठाच्या अमृत काळामध्ये अग्रगण्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांसह सहयोगी कार्यक्रमांद्वारे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणामध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचे मत कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी मांडले. जागतिक बदलांमध्ये बदलत्या भू - राजकीय घडामोडी तसेच भारतातील सांस्कृतिक बदल लक्षात घेऊन भारतीय युवा पिढीला नवीन उत्कर्षाच्या संधी निर्माण करता येईल असे मत प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी या परिषदेत मांडले.

विद्यापीठाच्या आंतराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ.) विजय खरे ह्यांनी निमंत्रित केलेल्या या परिषदेत प्रा. (डॉ.) महदी एलहुसेनी,कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, बेकर्सफील्ड (CSUB) अमेरिका, प्रो. डॉ. सर्ज वेलेस्को, अप्लाइड सायन्स विद्यापीठ, मिटवेडा, जर्मनी, शैक्षणिक डीन आणि परदेशी अधिकारी तसेच अधिसभा सदस्य क्रांती देशमुख आदी सदस्य उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आभार प्रदर्शन प्र -कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी केले

जागतिक व्हिलेजच्या बदलत्या गतिशीलतेतील व्यवसाय जोखीम" (BRCDGV) या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे पोलंड, भारत, रोमानिया आणि इतर अनेक देशांमधील उच्च शिक्षणामध्ये संस्थात्मक सहकार्य वाढवणे असा आहे. पोलंड येथील इंडो-युरोपियन एज्युकेशन फाऊंडेशन, पोलंडमधील भागीदार विद्यापीठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारत, रोमानिया आणि इतर विविध देशांच्या सहकार्याने सुरू केलेले, BRCDGV एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करते. भारत, पोलंड, जर्मनी (EU-27), यूएसए आणि इतर अनेक युरोपियन आणि गैर-युरोपियन देशांमधील शिक्षण आणि उद्योगांना प्रशिक्षण, समस्यांवर उपाय प्रदान करणे, कार्यक्षमता सुधारून आणि जबाबदाऱ्यांची खात्री करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्धिष्ठ आहे.


Post a Comment

0 Comments