अल्पवयीन मुलीचा विनयभंग तरुणाला ६ महिनेची शिक्षा पुण्यातील बातमी...
पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला विशेष (पोक्सो) न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा आणि ३ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शुभम बाबू कुसाळकर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा मुलीच्या महाविद्यालयामध्ये शिकत होता. तो कायम तिचा पाठलाग करायचा. पीडिता महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये जात असताना तिच्या हाताला धरून तरुणाने तिला ओढले. वॉशरूमला जाताना 'येऊ का' अशी अश्लील टिप्पणी करीत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेन, अशी धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाला अटक करण्यात आली. न्यायालयाने तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
Post a Comment
0 Comments