गुन्हेगारांची परेड सुरु पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे ऍक्शन मोडवर...
पुणे : पुणे शहरचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर असून, सलग दोन दिवस पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढली. कुख्यात गँगस्टरसह जवळपास रोज दोन दिवस साधारण तीनशे गुंडाना पोलिस आयुक्तालयात बोलवून त्यांना पोलिसी भाषेत समज दिली जात आहे.
गँगस्टरनंतर नार्कोटिक्स पेडलर अर्थात अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार, बेकायदा शस्त्र विक्रीत आरोपी असेलेले गुन्हेगार बोलवून बुधवारी पुणे पोलिसांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली. तिसऱ्या दिवशी क्राईम रिलस्टार अर्थात रायझिंग क्रिमीनल शोधून त्यांची शाळा घेतली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांना धडकी भरली आहे.
पुणे शहरात गांजा, ड्रग्ज आणि बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलिस आयुक्तांनी कार्यालयात ओळख परेड सुरू आहे. शहरातील कुख्यात गुंडाची ओळख परेड झाल्यानंतर शहरांमध्ये बेकायदेशीर रित्या पिस्टल ड्रग्ज आणि गांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची पुण्यातील आयुक्त कार्यालयात ओळख परेड सुरू आहे.
रिल्स वर भाई बनण्यासाठी उत्सुक असणारे किंवा गुन्हे आणि गुन्हेगार यांच उदात्तीकरण करणारे रिल्स बनवणारे शोधून त्यांची परेड पोलिस आयुक्तालयात घेतली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी सोशल मीडिया वर गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे शोधण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेची मिळून एक टीम तयार केली असून येरवडा जेल खून किंवा गुन्ह्याची कलम लावून सांकेतिक रिल्स बनवणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या गुंडाना धडा शिकवल्यानंतर आता आभासी जगात भाई झालेल्यांचा नंबर आला आहे.
पुणे पोलिस आयुक्तलयात बुधवारी आर्म्स अॅक्ट आणि नार्कोटिक्स वाल्यांची क्राईम ब्रँचकडून ओळख परेड राबवण्यात आली. पुणे शहरात बेकायदा शस्र बाळगणारे, अथवा फायरिंग करणाऱ्या गुंडाना सज्जड दम भरला आहे. गांजा, अफू, ड्रग्जची विक्री करणारेही बोलावून घेतले होते. यापुढे अवैध शस्र बाळगाल तर यादा राखा. यापुढे ड्रग्जचा बंद म्हणजे बंद म्हणजे बंदच, अशी सक्त ताकीद क्राईम ब्राँचने दिली आहे.
पुणे शहरातील अवैध मटका, जुगार, क्लब, लॉटरी, अवैध पत्त्यांचा क्लब चालविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाकडून बोलविण्यात आले होते. यावेळी 60 अवैध यांची परेड घेण्यात आली. यात नाईक, आंदेकर, कुंभार, याच्यासह चर्चित अवैध व्यावसायिकांना अवैध काम आढळून आल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडूनरेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले आहे. ज्यांच्या नावावर सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे असे हे स्थानिक पातळीवरचे गुन्हेगार आहेत. टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी दोनशेच्या आसपास स्थानिक गुन्हेगार पोलिसांकडून हजारीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला जाईल. यामध्ये शस्त्रे, अमली पदार्थ आणि स्थानिक पातळीवरील गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्यातील पाचशेहून अधिक गुन्हेगारांचा समावेश आहे. 32 पोलिस ठाण्यात रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांना बोलावण्यात आले आहे. सध्या पोलिस आयुक्तालयात रोज गुड्यांची परेड पाहायला मिळत आहे. यामाध्यामातून गुंडांचा सज्जड दम देताना दिसत आहे.
Post a Comment
0 Comments