सासवड-हडपसर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने उडवले दुचाकीस्वार ठार...
पुणे : सासवडवरून हडपसर येथे निघालेल्या दुचाकीस्वाराचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत फुरसुंगी येथे मृत्यू झाल्याची घटना घडली. राजू बाब्या काट रावत (४६, रा. खंडोबानगर, सासवड), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू रावत हे २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सासवडवरून हडपसर येथे जात होते. फुरसुंगी येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात राजू रावत जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापूराव खंदारे करीत आहेत.
Post a Comment
0 Comments