एसटीचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू, पिंपळगाव फाटा येथील घटना...
पुणे : एसटीचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर मंचर गावचे हद्दीत पिंपळगाव फाटा येथे घडली. हौशीराम महादू शेवाळे (६४, रा.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस ही मंचर बाजूकडून कळंब बाजूकडे चालली होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मंचर गावच्या हद्दीत पुणे - नाशिक महामार्गावर सोहम नगरीसमोर हौशीराम महादू शेवाळे हे बसमधून (क्र. एमएच ०७ सी ७५५८) खाली उतरत होते. त्यावेळी एसटी बसचालक मनोहर पंढरीनाथ पवार (रा. सिन्नर, वडगाव) याने बस चालू केल्याने बसचा धक्का हौशीराम शेवाळे यांना बसला. या धक्क्याने खाली पडून एसटीचे वाहकाच्या बाजूच्या पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने शेवाळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सत्यवान हौशीराम शेवाळे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे.
Post a Comment
0 Comments