Type Here to Get Search Results !

वाघोली पोलीस चौकीसमोर एका तरुणाने स्वतःला घेतले पेटवून पुण्यातील धक्कादायक घटना.

वाघोली पोलीस चौकीसमोर एका तरुणाने स्वतःला घेतले पेटवून पुण्यातील धक्कादायक घटना...

पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी एका तरुणाने पोलीस चौकी समोर स्वतःला पेटवून घेतले आहे. रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

यामध्ये तरुण ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments