पुण्यातले एका कार डीलरचा हॉटेलमध्ये खून प्रेमाच्या त्रिकोणातून घेतला जीव
पुण्यातील बातमी...
पुणे : पुण्याच्या एका कार डीलरचा गुवाहाटीच्या एका तारांकित हॉटेलमध्ये खून झाल्याची घटना घडली आहे. या खुनाचा अवघ्या काही तासांत गुवाहाटी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी गुवाहाटी पोलिसांना कोलकत्याच्या एका जोडप्याला विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
संदीपकुमार कांबळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अंजली शॉय आणि बिकाशकुमार शॉय यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी खूनाची कबूली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासातून उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोलकाता विमानतळावर एक हॉटेलात काम करणाऱ्या अंजलीचे आणि संदीप कांबळे याच्यासोबत गेल्या वर्षीपासून प्रेम संबंध होते. मात्र अंजलीचे बिकाशकुमारसोबत प्रेम् संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी आग्रह करत होता. त्यातच संदीप कांबळेसोबत अंजलीचे काही खासगी छायाचित्रे असल्याने या प्रकरणात तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे अंजली आणि विकास यांच्या नात्याला तडा गेला. पण काही कालावधीनंतर दोघांमध्ये समेट झाली.
त्यानंतर दोघांनी संदीपच्या मोबाईलमधून पुरावे मिटवल्याशिवाय तिढा सुटणार नाही. असं अंजलीला वाटले म्हणून अंजलीने संदीपला कोलकात्याला बोलावले. पण संदीप कोलकात्याला न जाता थेट गुवाहाटीला गेला आणि तिथे एका तारांकित हॉटेलात रूम बुक करून अंजलीला बोलावून घेतले. अंजलीचा बॉयफ्रेंड बिकाश हा त्या हॉटेलात स्वतंत्र रूम घेऊन उतरला. अंजली आली तेव्हा तिने संदीपच्या रूममध्ये जात चर्चा सुरू केली. तेवढ्यात बिकाश आत आला.
Post a Comment
0 Comments