Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

धावत्या बस मध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक तरीही त्या ड्राइव्हरनी ६५ प्रवाशांचा जीव वाचवला

धावत्या बस मध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक तरीही त्या ड्राइव्हरनी ६५ प्रवाशांचा जीव वाचवला... 

श्चिम बंगालमध्ये एक मोठा अपघात होताना थोडक्यात बचावला आहे. येते धावत्या बसमद्ये ड्रायव्हरला हार्ट अॅटॅक आला. मात्र तशा परिस्थितीतही या ड्रायव्हने बसचे ब्रेक मारले आणि बसमध्ये बसलेल्या किमान 65 जणांचा जीव वाचला.

ही बस बालासोर जिल्ह्यातील नीलगिरी भागातील पंचिलिंगेश्वर येथे जात होती. विशेष म्हणजे, या बसमध्ये सर्व भाविक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कोलकात्यातील होते. एसके अख्तर असे संबंधित ड्रायव्हरचे नाव आहे. त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. यानंतर त्याने बस रस्त्याच्या कडेला लावली. यानंतर लगेचच तो बेशुद्ध झाला. यानंतर प्रवाशांनी या ड्रायव्हरला नीलागिरी रुग्णालयात हलवले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बस अचानक थांबली, तेव्हा ड्रायव्हरला टॉयलेटला जायचे असावे, असे वाटले. मात्र, जवळ जाऊन बघितले असता, ड्रायव्हर सीटवरच बेशुद्ध झाला होता. यानंतर तातडीने अॅम्ब्यूलन्स बोलावण्यात आली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. ही बस हावडाची असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments