पुण्यातील कोंढव्यात अवैध बांधकामांचा सुळसुळाट ; शहरात गुंठेवारी बांधकाम व्यवसायिकांमध्ये बांधकाम विभागाची भीती असताना कोंढव्यात आम्ही कोणाला घाबरत नसल्याचे चित्र ?
पुणे :- राज्यात अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून अतिक्रमण विभागाकडून बांधकाम विभागाकडून अनेक अवैध इमारती पाडण्यात आल्या. अनेक अवैध बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी धास्ती घेत हे गोष्ट चालत असताना आप आपले नवीन गुंठेवारीची इमारत बांधण्याचे काम तात्काळ थांबविले. परंतु शहर एकीकडे आणि कोंढवा हा भाग एकीकडे पडल्याचा चित्र सध्या पुण्यात दिसत आहे. कारण या ठिकाणी एकाच लाईनीमध्ये 6 अवैध बांधकाम होत असल्याचे आमच्या हाती लागले आहे. या इमारतींचे फोटो तसेच याचे जिओ लोकेशन, काम करत असतानाचे फोटो आमच्या हाती लागले आहेत. नक्की पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभाग खरंच जागा आहे का ? की झोपलेला आहे? अशी परिस्थिती सध्या कोंढव्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये शहरातील बांधकाम व्यवसायिक एका ठिकाणी आणि कोंडव्यातील बांधकाम व्यवसायिक वेगळ्या ठिकाणी यांना कोणाची भीती नसल्याची चित्र सध्या पुण्यात दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य समिती यांना कडक निर्देश दिले असून सुद्धा याचे पालन महानगरपालिकेकडून होत नसल्याचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.
का होत नाही कोंढाव्यातील अवैध बांधकामांवर कारवाई ?
आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, अनेक पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी यांचे आणि गुंठेवारी मध्ये अवैधपणे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये लागेबांधे आहेत. या झोन मधील अधिकाऱ्यांना या अवैध बांधकाम व्यवसायकांकडून कारवाई होऊ नये आणि त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये यासाठी मोठी रक्कम ते घेत असल्याचे सूत्रांकडून आणि काही बांधकाम व्यावसायिकांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
कुठे कुठे चालू आहेत बांधकाम फोटो आणि पत्ता ?
भाग्योदय नगर मक्का मस्जिद जवळ कोंढवा
भाग्योदय नगर मदिना डेअरी समोर कोंढवा
हे सर्व बांधकाम कोंढवा खालचा बस स्टॉप पासून ते मक्का मस्जिद भाग्योदय नगर पर्यंत सुरू आहेत.
यावर आता पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः
Post a Comment
0 Comments