Type Here to Get Search Results !

वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या...

वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या...

पुणे :- दिनांक २७/१२/२०२३ रोजी रात्री मुंढवा पोलीस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०,५७०/- रु चा मुददेमाल चोरुन नेला होता. त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर ४०१/२०२३ भा.द.वि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार करीत होते, तपासात दोन पथक नेमण्यात आले होते. दोन्ही पथकामार्फत सीसीटीव्ही च्या माध्यमातुन आरोपींचा शोध घेण्याचे काम चालु होते. सदर तपासात सलग १५ दिवस एकुण २५० च्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपास चालु असतानाच तपास पथकातील अंमलदार पोशि सचिन पाटील व पोशि स्वप्नील रासकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहीती मिळाली की. सदर गुन्हयातील संशयित आरोपी खडकी परीसरात येणार असल्याची माहीती मिळाली. सदरची माहीती ही तात्काळ त्यांनी तपास पथकातील प्रभारी सपोनी संदीप जोरे यांना कळविली. त्यांनी सदरबाबतची गोपनीय बातमी वपोनी महेश बोळकोटगी यांना कळवुन त्यांनी लागलीच कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य तो सापळा रचुन संशयित दोन आरोपीना ताब्यात घेतले. त्यांना मुंढवा पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या दोन साथिदारांनी मिळून सदरचे वाईन शॉप हे दारुची विक्री करण्याचे उददेशाने फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) ओंकार ऊर्फ पल्या सुधाकर परमवार वय २४ वर्षे रा ९२ जुनाबाजार, नवी तालीम समोर खडकी पुणे २) अरबाज मुनीर शेख वय १९ वर्षे रा घर नं ७७/२१ खडकी बाजार गोपी चाळ खडकी पुणे असे असुन दोन्हीही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे शहरात विविध पोलीस ठाणेस चोरीचे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीस मा प्रथमवर्ग न्यायालय लष्कर कोर्ट पुणे यांनी दिनांक २३/०१/२०२४ रोजी पर्यतची पोलीस कस्टडी दिलेली असुन पोलीस कस्टडीत आरोपीकडुन ३३,६००/- रु किमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली असुन अटक आरोपीकडे गुन्हयातील रोकड बाबत अधिक तपास चालु असुन आरोपीच्या इतर साथिदार यांचा शोध घेण्याचे काम चालु आहे.

सदरची कामगीरी रीतेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर,  रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, ए. राजा पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments