Type Here to Get Search Results !

राज्याला काळीमा फासणारी घटना ; आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत महाराजांनी केले अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार...

राज्याला काळीमा फासणारी घटना ; आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत महाराजांनी केले अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार...

पुणे :- राज्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आळंदीतील एका महाराजावर तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर  करून आळंदी पोलीस स्टेशनला कलम भादंवी ३७७ व पोस्को कायदा कलम ४ ५ ( f ) ६ ८ १० अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदीत वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामुळे राज्यातील वरिष्ठ ही घटना ऐकून हैराण झाले आहे. आळंदीतील एका महाराजावर तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय ५२ वर्षे) असं अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आळंदीमध्ये राहणारा दासोपंत महाराज येथे मृदुंग वादन शिकवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेचा संचालक आहे. यामध्ये जवळपास ६० ते ७० विद्यार्थी दासोपंत यांच्याकडे मृदुंग वाद्य शिकण्यासाठी येतात. मात्र दोन महिन्यापूर्वी दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने अन्य दोन अल्पवयीन मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य केले. या तीन मुलांवर त्याने अनेकवेळी अनैसर्गिक अत्याचार केले व कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 


वारकरी संप्रदायात या प्रकारामुळे खळबळ...
याप्रकरणी पॉस्को कलमाखाली आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम महाराजास बेड्या ठोकल्या आहेत. आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदायात मात्र एकच खळबळ उडालेली आहे.

आळंदी पोलीस गुन्हा दाखल करण्यास करत होते टाळाटाळ...
यातील एका मुलाला वेदना असह्य झाल्यानं, त्याने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर त्याच्या पालकाने थेट आळंदी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सुरुवातीला आळंदी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाकाळ करत होते. मात्र नंतर वरिष्ठांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अन्य दोन मुलांनीही महाराजांवर आरोप केले. अशाप्रकारे दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. आत्तापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

आळंदी पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी महाराजास अटक केली आहे. त्याचबरोबर महाराजाकडून आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदाय हादरला आहे.

यामध्ये प्रकारामध्ये आळंदी पोलीसांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. कारण एवढा मोठा प्रकरण असताना देखील हे सर्व गुन्हा नोंद करण्यात टाळाटाळ करत होते. जर पोलीस असे करत असतील तर पीडितांचे कसे होणार ? यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments