Type Here to Get Search Results !

अवैध धंद्यांचा सुळसुळाट : पुणे शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? सुरज उर्फ गुंड्या माचरेकर करतोय कायद्याची पायमल्ली ; लवकरच सर्व अवैध धंद्यांचे नावे आणि पत्त्यासहीत करणार जाहीर...

अवैध धंद्यांचा सुळसुळाट : पुणे शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? सुरज उर्फ गुंड्या माचरेकर करतोय कायद्याची पायमल्ली ; लवकरच सर्व अवैध धंद्यांचे नावे आणि पत्त्यासहीत करणार जाहीर...

पुणे - शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढत आहे. जुगार, दारूविक्री, गुटखा विक्री, आणि वेश्याव्यवसाय अशा अनेक अवैध धंद्यांमुळे शहराची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच भर पडता विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर या परिसरामध्ये एका गुन्हेगारांनी अवय धंद्यांचा अतिरेक केला आहे. या व्यक्तीचे नाव सुरज उर्फ गुंड्या माचरेकर असे असून याचे मटका, गांजा विक्री, विदेशी दारू विक्री असे हा व्यक्ती करत आहे. 
या व्यक्तीवर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई देखील झाले होते. या तडीपार आदेशाला त्याने पोलिसांशी लागे बांधे करून आदेश रद्द करून आणला आहे.
या व्यक्तीचे जुगाराचे अड्डे, दारू विक्री, गांजा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय विश्रांतवाडीच्या अनेक भागात जुगाराचे अड्डे जोरात चालू आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात आहे आणि पैशासाठी गुन्हेगारीकडे वळत आहे. 
विश्रांतवाडी भागात दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. बेकायदेशीर दारूच्या विक्रीमुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
नागरिकांनी या अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नागरिकांनी अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

लवकरच या हद्दीतील असलेले सर्व अवैध व्यवसायांचे फोटो सहित मालकांचे नाव आणि पत्ते टाइम्स ऑफ महाराष्ट्र प्रसिद्ध करणार आहे.

क्रमशः

Post a Comment

0 Comments