Type Here to Get Search Results !

बहिणीचा प्रेमसंबंद असल्याने दोन भावांकडून तरुणाचा खून सांगलीतील घटना

बहिणीचा प्रेमसंबंद असल्याने दोन भावाकडून तरुणसा खून सांगलीतील घटना...

कुपवाड : बहिणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ रा.दत्तनगर, बामणोली) या युवकाचा संशयित ओंकार जावीरसह अन्य तिघांकडून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

काल, रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्याजागेत ही घटना घडली. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार निलेश जावीर (वय २०), रोहित बाळासाहेब केंगार (१८), सोहम शहाजी पाटील (२०), ज्ञानेश्वर पाटील (२०, रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांचा समावेश आहे. यापैकी ओंकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे. तर कुपवाड पोलीसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर पाटील फरार आहे. मृत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी या घटनेची कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबीयांसोबत बसला होता. दरम्यान संशयित ओंकार जावीर याने मृत ओमला दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ओंकारने ओम याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असा जाब विचारला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली.

दरम्यान, जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार याने चाकू व कोयत्याने ओमच्या पोटात व डोक्यावर सपासप वार केले. या खूनी हल्ल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी आरडाओरडा पाहून लगतच असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला. ओमला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओमचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

Post a Comment

0 Comments