पुण्यातील पब मध्ये घडतायेत अश्लील प्रकार ; एलरोव पब मध्ये चुम्मा चुम्मा देदे चुम्मा ; पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू आहेत पब ; राज्य उत्पादन शुल्कातील कोणत्या अधिकाऱ्याची मिळत आहे आशीर्वाद ?
पुणे :- काही दिवसांपूर्वीच टाईम्स ऑफ महाराष्ट्राने कल्याणी नगर येथे असलेले ELROW पबची बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु आज तागायत त्यांच्या वर राज्य उत्पादन शुल्क या विभागाने काडीमात्र कारवाई केली नाही. याच्या पलीकडे काही अधिकारी कारवाई करायला गेले असता त्यांना तसेच दीड वाजता पबला बंद करण्यात करिता गेले असता अधिकाऱ्यांना पबच्या सुरक्षा रक्षकांकडून लिफ्ट बंद असल्याचे असे दिशाभूल करत असल्याचे त्या ठिकाणी असलेले नागरिकांकडून माहिती मिळाली आहे. तसेच या कारवाई साठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी कारवाई करू नका म्हणत दाबण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून तसेच दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे.
एलरोव पब मध्ये चुम्मा चुम्मा देदे चुम्मा...
टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती एक व्हिडिओ लागला आहे त्यामध्ये पहाटे पाच वाजता एक युवक युवती पब मध्ये अश्लील चाळे करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भविष्यात जर गंभीर व अनैतिक बाब घडली तर याला जबाबदार कोण अशी चिंता व्हिडिओ पाहणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
"शूर वीर सरदार आम्हाला नाही कोणाची भीती"...
पब वाले बिनधास्त न कोणाची भीती बाळगता धांगडधिंगा करत आहेत. ते स्वतः म्हणत आहेत.
"शूर वीर सरदार आम्हाला नाही कोणाची भीती"
ह्यामध्ये नेमका प्रश्न असा निर्माण झाला होता
ह्यांना आशीर्वाद नेमका कोणाचा यावर माहिती घेतली असता, पुण्याचे वरीष्ठ अधिकारी हेच पब वाल्यांची पाठराखण करत असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
लवकरच यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे माहिती प्राप्त करून त्यांची नावे टाईम्स ऑफ महाराष्ट्र जाहीर करणार.
आम्हाला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, १ डिसेंबरला पॅराडॉक्स नावाचा फेमस व्यक्ती या पबला भेट देणार असून, त्यासाठी एका टेबल च्या बुकिंग साठी चक्क 75000 हजार रुपये घेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याही पलीकडे ज्यांनी ज्यांनी टेबल घेतलेला आहे त्यांना वेळ ही सहा वाजेपर्यंत ची सांगितली असल्याची कळाले आहे.
यावरून स्पष्ट दिसून येत आहे की, राज्य उत्पादन शुल्क हे यांच्याकडे कारवाई करणार नाही. असे चित्र यामधून दिसून येत आहे.
दलित पॅंथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख यांनी सांगितले की, आमच्या पुण्यातील युवक युवतीचें जर नुकसान हे पब वाले करत असतील आणि हे पब जर वेळेत बंद होत नसतील तर, आम्ही तीव्र स्वरूपाची भूमिका घेणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.
तसेच त्यांनी या व्हिडिओ मध्ये घडलेल्या अश्लील प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या काळात खेळला गेला जुगार...
दिवाळीच्या महिन्यात पब मध्ये अक्षरशः जुगार सुद्धा खेळला गेल्या असल्याचे फोटोज टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती लागले आहेत.
एलरोव पब हे रूप टॉप च्या ठिकाणी सुरू आहे. यावर पुणे महानगरपालिकेतून अधिकारी डोळे बंद करत लक्ष न देण्याचे ठरवले आहे. हे पब टेरेसवर सुरू असून याला आपातकालीन परिस्थितीत निघण्यासाठी मार्ग नाहीये. तसेच अवैधरित्या टेरेसवर बांधकाम देखील करण्यात आलेले आहे याचे देखील फोटो आमच्या हाती लागले आहे परंतु पुणे महानगरपालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment
0 Comments