पुणे : येरवडा - जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या क्लिनिकवर कारवाई करीत आरोग्य निरीक्षकांनी संबधित क्लिनिकला २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणाऱ्या नागपुरचाळ, बदामी चौक येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.याची चौकशी केली असता तो कचरा डेन्ट व्हाईट डेन्टल या क्लिनीकचा असल्याचे तपासामध्ये निदर्शनास आल्याचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक स्वपनील कुताळ यांनी सांगितले. जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी रुग्णालयासांसाठी एक वाहन देण्यात आले आहे.
त्या वाहनातून प्रत्येक रुग्णालय, क्लिनिकाकडुन हा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली जाते. जैववैद्यकीय कचरा उघड्याबर टाकणे हे हानिकारक असते, त्यामुळे या विषयाचे गांभीर्य विचारात घेवुन सहायक आयुक्त विजय नायकल यांच्या नियंत्रणानाखाली या क्लिनिक विरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच प्रभागातील जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने वाहन् उपलब्ध करुन दिले असल्याने रुग्णालये, क्लिनिकने संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विजय नायकल यांनी केले.
Post a Comment
0 Comments