पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे झाले नुकतेच उद्घाटन...
पुणे :- धानोरी परिसरातील बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर युनिटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये आलेल्या कॅन्सरच्या रुग्णांना राहण्याची व नर्सिंगची सेवा निःशुल्क मिळणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने डाॅक्टरांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शहरातील विविध भागांमधील फॅमिली डाॅक्टर्स उपस्थित होते.
या प्रसंगी कॅन्सर या आजाराविषय़ी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी सुप्रसिद्ध आॅन्कोसर्जन डाॅ. प्रशांत चंद्रा यांच्यासह आॅन्को रेडिएशन तज्ञ डाॅ. अजिता चंद्रा आणि डाॅ. भूषण भळगट उपस्थित होते. या तज्ञ डाॅक्टरांनी मानवी शरीराच्या विविध अवयवांना होणारे कॅन्सरचे आजार, त्यांची लक्षणे, करावयाच्या विविध प्रकारच्या टेस्ट व घ्यावयाचे उपचार यासंबंधी पीपीटी प्रेझेंटेशन सह सविस्तर मार्गदर्शन दिले.
या वेळी डाॅ. रश्मी बापट यांनी सांगितले की, बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या पॅलिएटिव्ह केंद्रात भर्ती होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांना राहण्याची व नर्सिंगची सुविधा पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. तसेच कॅन्सर संदर्भात आगामी काळात जनजागृती करण्यासाठी बापट हाॅस्पिटल, इनोव्हिजन प्लस, अक्षर मानव, आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था यांच्या वतीने एक मोठे अभियान राबवले जाणार आहे.
या वेळी आई-बाबा मेडिकल फाउंडेशनच्या एमडी माधुरी पाठक आणि सतीश पाठक यांचा तज्ञ डाॅक्टरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पॅलिएटिव्ह सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित सेमीनारला उपस्थित राहिलेल्या सर्व डाॅक्टरांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय उपस्थित सर्व डाॅक्टरांनी या वेळी बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या पॅलिएटिव्ह सेंटरच्या बॅनरवर आपापली सही करून या हाॅस्पिटलच्या औपचारिक उद्घघाटनाला आपला योग्य पाठिंबा जाहीर केला.
या उद्घाटन कार्यक्रमाला आणि कॅन्सवरील सेमीनारला सिग्नोरा न्यूट्रिशन कंपनीच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन इंनोव्हीजन प्लसचे डायरेक्टर व अक्षर मानवचे व्यापार व उद्योग विभाग प्रमुख परेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाले तसेच इंनोव्हीजन प्लस व अक्षर मानव चे कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments