Type Here to Get Search Results !

भरधाव बसने दिली झाडाला धडक ; पुण्यात स्कुल बसचा भयानक अपघात...

भरधाव बसने दिली  झाडाला धडक ; पुण्यात स्कुल बसचा भयानक अपघात...

पुणे : पुण्यामध्ये एका शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 4 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदलली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले. सुदैवाने या अपघाताने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस येऊन धडकताना दिसते. बसचा दरवाजाकडचा भाग झाडाला धडकल्यानंतर व्हिडीओमध्ये बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाल्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरूवात केली.

आरटीओचं नियंत्रण नाही

या अपघातात सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. मात्र पैसै मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र ती होताना दिसत नाही.


Post a Comment

0 Comments